तीन वर्षांपासून दुकाने दिसली नाहीत का? ः योगेश रोकडे यांचा सवाल तीन वर्षांपासून दुकाने दिसली नाहीत का? ः योगेश रोकडे यांचा सवालतीन वर्षांपास...
तीन वर्षांपासून दुकाने दिसली नाहीत का? ः योगेश रोकडे यांचा सवाल
तीन वर्षांपासून दुकाने दिसली नाहीत का? ः योगेश रोकडे यांचा सवालतीन वर्षांपासून दुकाने दिसली नाहीत का? ः योगेश रोकडे यांचा सवालतीन वर्षांपासून दुकाने दिसली नाहीत का? ः योगेश रोकडे यांचा सवाल
सुपा | नगर सह्याद्री-
रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर उतरलेल्या सुप्याचे पोलिस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांना सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांनी धारेवर धरीत व्यवसायिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविला. गोकावे साहेब तुम्ही हप्ते घेता, हप्ते! असे सुनावत तुम्ही घेत असलेल्या हप्त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. ते सार्वजनिक केले तर तुमची मोठी अडचण होईल, असा इशाराही दिला. दरम्यान, या घटनेचे व्हिडीेओ व्हारयल झाल्याने सुपा पोलिस ठाण्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
रोकडे विरोधात अहवाल
रात्रीच्या वेळी कोयत्याने हल्ले होण्याचे प्रकार वाढले होते, त्यामुळे सुपा ग्रामपंचायतने आम्हाला पत्र देऊन कारवाईची मागणी केली. आम्ही रात्री पावणेबारा वाजता सुपा महामार्गावरील दुकाने बंद करत असताना योगेश रोकडे यांनी गोंधळ घातला. मी पैसे घेतो असे आरोप त्यांनी केले. मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही, योगेश रोकडे यांच्या विरोधात गोपनीय अहवाल तयार केला आहे.
- नितीनकुमार गोकावे, पोलिस निरीक्षक, सुपा.
सुपा गावात बेकरी उत्पादने प्रसिद्ध असून पुणे जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा भागातील ग्राहकांची त्यांना पसंती आहे. सुरूवातीस एका परप्रांतीयाच्या बेकरीनंतर आता तेथे अनेक बेकर्या सुरू झाल्या असून दर्जेदार उत्पादनांमुळे मोठी मागणी आहे. व्यवसायात स्थानिक तरूण उतरले असून रात्री उशिरापर्यंतही दुकाने सुरू असतात. याच ठिकाणी फुलांच्या आकर्षक हारांनाही मोठी मागणी असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुप्यातील हा भाग गजबजलेला असतो. ही दुकाने ११ नंतर बंद करण्यासाठी पोलिस निरीक्षक गोकावे यांनी दुकानदारांशी हुज्जत घातली. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंचपती योगेश रोकडे यांना समल्यानंतर त्यांनी तेथे येत गोकावे यांना जाब विचारला. यावेळी तेथे मोठी गर्दी जमा झाली होती.
आ. नीलेश लंके यांनाही निवेदन
पोलिस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांच्या जाचास कंटाळून अलिकडेच टपरी व्यवसायिकांनी आमदार नीलेश लंके यांना निवेदन दिले आहे. त्यासंदर्भात आ. लंके यांनी त्यांना जाबही विचारला होता. गोकावे दरमहा दोन-दोन हजार रूपये हप्ते घेत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्या निवेदनाबाबतही काही व्यावसायिकांनी गोकावे यांना जाब विचारला.
रोकडे म्हणाले, अनेक वर्षांपासून येथील बेकरी, फुलांचे व्यवसाय सुरू आहेत. स्थानिक तरूण उदरनिर्वाह करीत आहेत. पोलिस निरीक्षक म्हणून गोकावे सुपा पोलिस ठाणे सांभाळीत आहेत. त्यावेळी त्यांना हि दुकाने का दिसली नाहीत. तुम्ही गोरगरीब टपरीवाल्यांचे महिन्याला दोन दोन हजार रूपये गोळा करता. बेकरी व्यवसायिकांकडून पैसे घेता. बेकरीवाल्यांचे हाप्ते मिळण्यास या महिन्यात उशिर झाला म्हणून तुम्ही आज रस्त्यावर उतरले. एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी तुम्हाला हे विचारतो आहे. हा चौक या अगोदरही सुरू होता. त्यावेळी तुम्ही कारवाई का केली नाही, असा प्रतीप्रश्न रोकडे यांनी केला. ‘तुमच्या रोजीरोटीसाठी आम्ही दुर्लक्ष करीत होतो’ असे गोकावे म्हणाले. त्यावर आमची नव्हे तुमची रोजी रोटी सुरू असल्याचे सांगत तुम्ही दर महिन्याला हप्ते गोळा करता, असे रोकडे यांनी सुनावले. हप्ते वसुलीचे पुरावे आमच्याकडे आहेत. वेळ आल्यावर ते सार्वजनिक करू, असेही स्पष्ट केले.
COMMENTS