मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ’शहजादा’ सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. परंतु बॉस ऑफिसवर या सिने...
मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ’शहजादा’ सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. परंतु बॉस ऑफिसवर या सिनेमाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. कार्तिकच्या करिअरमधला हा सर्वाधिक अयशस्वी सिनेमा ठरला आहे. परंतु खरी बातमी तर दुसरीच आहे. क्रितीच्या या सिनेमादरम्यान अभिनेता श्रेयस तळपदे चर्चेत आला आहे. श्रेयसच्या ट्विटर हँडलवरील ट्वीटचा एक स्क्रिनशॉट व्हायरल होतो आहे. त्यात म्हटलं आहे की, आताच ’शहजादा’ सिनेमा पाहिला. कार्तिक आर्यन चांगलं काम केलं आहे. तर क्रिती सेनॉन ही देशाची पुढची मधुबाला आहे, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. श्रेयसच्या या ट्वीटवर क्रितीनं देखील उत्तर दिल्याचं स्क्रिनशॉटमध्ये दिसते आहे. परंतु या मागचं सत्य काही वेगळं आहे. ’शहजादा’ सिनेमात क्रिती आणि कार्तिक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाला बॉस ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र काहीजणांना हा सिनेमा आवडला. त्यांनी सिनेमाबद्दलची त्यांची मते ट्वीटवर मांडली आहेत. त्यात श्रेयस तळपदे या एका ट्विटर हँडलवरून २० फेब्रुवारी रोजी एक ट्वीट करण्यात आलं. त्यात म्हटलं आहे की ’शहजादा’ सिनेमा आताच पाहिला. कार्तिक आर्यननं यात खूप चांगलं काम केलं आहे. तर क्रिती सेनॉन ही तर देशाची पुढची मधुबाला आहे. हे ट्वीट पाहून क्रिती भारावून गेली. तिनं या ट्विटला उत्तर दिलं. ’वॉव मधुबाला यांची जागा तर नाही घेऊ शकत. परंतु इतकी प्रेमळ प्रतिक्रिया पाहून भारावून गेले आहे. धन्यवाद.’ या पोस्टबरोबर तिनं अनेक इमोजीही पोस्ट केले आहेत. हे ट्वीट श्रेयस तळपदे या व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंटवररून करण्यात आलं आहे, मात्र हे अकाऊंट फेक आहे. स्वत: श्रेयसने याविषयी माहिती दिली. दरम्यान अनेक नेटकर्यांनी म्हटलं आहे की, ’ब्ल्यू टीक मिळालेलं हे अभिनेत्याचं खोटं अकाऊंट आहे.’ परंतु हे अभिनेत्री क्रितीच्या लक्षात आलं नाही. आता नेटकर्यांनी अभिनेत्रीवर टीका करायला सुरुवात केली आहे. काही युजरनं म्हटलं की, हे अभिनेत्याच्या नावानं उघडलेलं खोटं अकाऊंट असल्याचं सरळ सरळ कळतं आहे. परंतु अभिनेत्रीची तुलना मधुबालाशी केल्यानं ती भारावून गेली आणि कोणताही विचार न करता तिनं या ट्वीटला उत्तर दिलं.
COMMENTS