पुणे / नगर सहयाद्री - विधेचं माहेर घर आसलेल्या पुण्यात एक धक्काधायक घटना घडली आहे. नवऱ्याच्या प्रमोशनसाठी त्याच्या बॉस सोबत शारीरीक संबंध ठे...
पुणे / नगर सहयाद्री -
विधेचं माहेर घर आसलेल्या पुण्यात एक धक्काधायक घटना घडली आहे. नवऱ्याच्या प्रमोशनसाठी त्याच्या बॉस सोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यासाठी विरोध केल्यावर विवाहितेस बेदम मारहाण करून छळ करण्यात आला आले. आपण हा सर्व त्रास आपल्या मुलासाठी मूकपणे सहन करत असल्याचं तक्रारीत म्हटलंय आहे. या प्रकरणात विवाहित महिलेने न्यायालय धाव घेतली आहे. न्यायालयाने महिला व बालविकास आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहे .
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, पुण्यात लैंगिक छळाचा अनोखा प्रकार बाहेर आला आहे. नंदनगर येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा पती कपड्यांच्या शोरूममध्ये विक्रीचे काम करतो. दोघांना १२ वर्षांच अपत्य आहे. पतीचा पगार महिन्याला १० हजार रुपये आहे. त्याला पगारात वाढ हवी होती आणि म्हणून त्याला प्रमोशन हवे होते. त्यासाठी पती आपल्या पत्नीला माझ्या बॉसशी संबंध ठेवावे लागतील, असे वारंवार सांगत होता. त्याने धमकीही दिली. महिलेने नकार दिल्यावर त्याने मारहाण करत छळ सुरु केला. अनेकदा दबाब आणला. पण महिलेने कधीच हो म्हटलं नाही.
पतीचा हा प्रकार दीराला ही सांगितला मात्र महिलेसबोत दीरानेही अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली, महिलेने आपल्या सासुलाही सांगितले पण सासूकडूनही मारहाण झाली. सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने हाताची नस कापली. मात्र उपचार होईपर्यंत सासरचे लोक गप्प राहिले. यानंतर त्याने पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्रासाला कंटाळून महिला पुणे येथून इंदूरला आली. तिच्या पाठोपाठ पतीहि इंदूरला आला आणि सर्वांसमोर मारहाण केली. याबाबत पीडितेने पोलिसांत तक्रार केली.
महिला न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने महिला व बालविकास विभागाला समन्स बजावले. प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर महिला व बालविकास विभागाच्या पथकाने पीडितेशी संवाद साधला. पीडितेची अनेक तास चौकशी केली. महिला व बालविकास विभागाच्या पथकाला तिच्यावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप खरे असल्याचे आढळून आले.आरोप विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.
COMMENTS