मुंबई /नगर सह्याद्री - भारताचे नंदनवन जम्मू काश्मीरात ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे.गरिबी हटावच्या घोषणा देऊनही जी गरिबी हटली नाही त...
मुंबई /नगर सह्याद्री -
भारताचे नंदनवन जम्मू काश्मीरात ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे.गरिबी हटावच्या घोषणा देऊनही जी गरिबी हटली नाही ती गरिबी या खजिन्यामुळे सहज हट शकते.मात्र हा खजिना मिळवणं फार अवघड आहे.
लिथियम हा एक नॉन-फेरस धातू आहे, त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरीमध्ये केला जातो. भारतात झालेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, जम्मूच्या सलाल-हिमाना या भागामध्ये हा खजिना सापडला आहे. इथे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहेत. यापैकी ५ ब्लॉक्स लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे आहेत. भारताला बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी तब्बल ३३, ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. नुकत्याच सादर झालेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.त्यामुळे एवढा मोठा खर्च सरकार करणार का? आणि केला तर तो कसा करणार? याकडे आता लक्ष लागून आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियम सापडणं ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे कारण, लिथियमचे अनेक फायदे आहेत.
COMMENTS