अहमदनगर | नगर सह्याद्री येथील न्यू लॉ कॉलेजमध्ये डिप्लोमा इन सायबर लॉ चा प्रथम दीक्षान्त समारंभ व सर्टिफिकेट कोर्स इन ड्राफ्टींग, प्लिडिंग ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
येथील न्यू लॉ कॉलेजमध्ये डिप्लोमा इन सायबर लॉ चा प्रथम दीक्षान्त समारंभ व सर्टिफिकेट कोर्स इन ड्राफ्टींग, प्लिडिंग अॅण्ड कन्व्हेंसिंग’, सर्टिफिकेट कोर्स इन टॅसेशन लॉ अॅण्ड प्रॅटीस’ या दोन पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी बोलताना मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष नंदकुमार झावरे म्हणाले, विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीचा उपयोग सर्वसामान्यांना योग्य आणि जलद न्याय देण्यासाठी करावा.
आधुनिक युगातील नवीन विधी क्षेत्रातील अभ्यासक्रमाचा वकिलांनी विचार करावा, असे आवाहन संस्थेचे सहसचिव विश्वासराव आठरे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्राची राजळे, असीया शेख यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीपदी निवड झाल्याबददल त्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, विश्वस्त दीपलक्ष्मी म्हसे आदी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य एम. एम. तांबे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. बी. डी. पांढरे यांनी केले. आभार अभ्यासक्रम समन्वयक प्रा. अतुल म्हस्के यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे यांनी केले.
COMMENTS