कोल्हापूर / नगर सहयाद्री - नागराज मंजुळे हे सोलापूर जिल्हयातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे आहेत. जेऊर सारख्या छोट्या गावातून येऊन आपल्या ...
कोल्हापूर / नगर सहयाद्री -
नागराज मंजुळे हे सोलापूर जिल्हयातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे आहेत. जेऊर सारख्या छोट्या गावातून येऊन आपल्या लेखणी आणि दिग्दर्शन कौशल्याद्वारे मायानगरीत एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांचा 'सैराट' हा चित्रपट सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला. पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची नागराज मंजुळे यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाड मध्ये कुस्तीच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे हे यांनी हजेरी लावली होती. दरम्यान कुस्तीच्या मैदानातच पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना पैलवानांना एक अनोखी उत्सुकता आहे.
बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, "खाशाबा जाधव हे जागतिक किर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच मी यासंदर्भात माहिती देईल. या सिनेमाचं शूटिंगदेखील कोल्हापुरात होऊ शकतं. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार आहे".
COMMENTS