औरंगाबाद / नगर सह्याद्री- शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष नाव मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. तर गट आक्रमक झाला...
औरंगाबाद / नगर सह्याद्री-
शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष नाव मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. तर गट आक्रमक झाला आहे. मुंबई येथील शिवसेना भवन हे आमच्यासाठी प्रॉपर्टी नसून मंदिर आहे. आम्ही मुंबईच्या शिवसेना भवनवर दावा करणार नाही, असं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं होतं. पण औरंगाबाद येथील शिवसेना भवन आम्ही ताब्यात घेणार असल्याची माहिती शिंदे गटाने दिली आहे.
वृत्तसंस्थाच्या मह्तीनुसार, औरंगाबादचे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण दिल्यानंतर चिन्ह शिंदे गट अधिक आक्रमक झाला आहे. राज्यभरातील शिवसेनेचे कार्यलये ताब्यात घेण्याचे प्रयत्न शिंदे गटाने सुरु केलेले आहेत. औरंगाबाद शहरातील शिवसेना आता आमचेच असून, आगामी काळात ते ताब्यात घेणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले, शहरातील आहे ते शिवसेना भवन नाहीच,शिवसेना भवन आम्ही नवीन उभारू आणि जी शिवसेना भवन म्हणून इमारत उभी आहे, ती देखील लवकरच ताब्यात घेऊ, असं शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले.
महापालिकेने शिवाई सेवा ट्रस्ट या संस्थेला औरंगपुरा येथील नाल्यावरची जागा २०१२ मध्ये भाडेतत्त्वावर बांधण्यासाठी परवानगी दिली. ही पाच मजली इमारत १२२४ चौरस मीटर जागेवर उभारली असून, तेथे २२ व्यापारी गाळे आहेत. या इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्राचे प्रकरण २०१५-१६ मध्ये पुढे आले होते. त्यावेळी दंड आकारण्यावरून वादही झाला होता.
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, कोण शिरसाट आणि कोण जंजाळ यांचा त्याच्याशी काय संबंध? शिवसेना भवन उभारताना यांनीच काड्या केल्या होत्या. शिवसेना भवन उभे राहू नये यासाठी यांनी त्यावेळेस प्रयत्न केले. त्यांनी मागणी केली तरीही काही फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.
COMMENTS