अहमदनगर । नगर सह्याद्री- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाने शहरातील सावेडी परिसरात दोन ठिकाणी...
अहमदनगर । नगर सह्याद्री-
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाने शहरातील सावेडी परिसरात दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे टाकत सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत 27 गॅस टाक्या, रीक्षा व साहित्य जप्त केले आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूसाहेब रोहोम, अन्नधान्य पुरवठा निरीक्षक एन. एम. पाईकराव, पथकातील एएसआय रवींद्र शिलावट, प्रमोद मंडलिक, मनोज दुसाने, सुरेश टोंगारे यांनी ही कारवाई केली. भिगारदिवे मळा परिसरात शाहरुख निसार शेख, तसेच प्रभात बेकरीसमोर पवन भिंगारदिवे बेकायदेशीर गॅस सीलिंडरमधून रीक्षामध्ये गॅस भरून देत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने भिंगारदिवे मळा परिसरातील सेंटरवर छापा टाकला असता एमएच 16 सीई 1063 या रीक्षामध्ये घरगुती गॅस सीलेंडरमधून तीन व्यक्ती मशीनच्या सहाय्याने भरत असल्याचे व आतमध्ये काही गॅस सीलेंडर आढळले.
पथकाने सेंटर चालक शाहरूख निसार शेख (वय 26, रा. भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड), रीक्षा चालक राजू नारायण सातव (वय 53, रा. पाईपलाईन हडको) व एका अल्पवयीनला ताब्यात घेतले. तसेच 10 सीलेंडर, साहित्य व रिक्षा असा मुद्देमाल ताब्यात घेतला.
हॉटेल जय आनंदच्या पाठीमागे सुरू असलेल्या गॅस रीफिलींग सेंटरवर एमएच 16 बीसी 0413 या रीक्षामध्ये घरगुती गॅस सीलेंडरमधून चार व्यक्ती मशीनच्या सहाय्याने गॅस भरत असल्याचे व मोकळ्या जागेत काही अवैध सीलेंडर आढळले.पथकाने तेथून पवन शरद भिंगारदिवे (वय 25, रा. सावेडी), जयंत छगन भिंगारदिवे (वय 38, रा. सावेडी गाव), अस्लम शेख (वय 23 रा. दौलावडगाव ता. आष्टी, जि. बीड), दिनेश परशराम गायकवाड (वय 46, रा. नालेगाव, दातरंगे मळा) यांना ताब्यात घेतले. तसेच 17 गॅस टाक्या, साहित्य व रीक्षा पथकाने जप्त केली
COMMENTS