अहमदनगर । नगर सह्याद्री ड्यूटी संपल्यानंतर रूमकडे जाणार्या हॉटेल रेडीअन्सच्या मॅनेजरवर चॉपरने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. शनि...
अहमदनगर । नगर सह्याद्री
ड्यूटी संपल्यानंतर रूमकडे जाणार्या हॉटेल रेडीअन्सच्या मॅनेजरवर चॉपरने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता माळीवाडा परिसरातील हॉटेल लकी व हॉटेल शिवसंग्रामच्या दरम्यान ही घटना घडली. प्रल्हाद परिमल चौधरी (वय 34 रा. बुधबुध, ता. मानका, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल, हल्ली रा. वरवंडी गल्ली, माळीवाडा) असे जखमी मॅनेजरचे नाव आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दया बोराडे व त्याच्यासोबतचे दोन अनोळखींविरूद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विशाल दत्तात्रय रासकोंडा (रा. वरवंडे गल्ली, माळीवाड) यांचे स्वातिक चौकात रेडीअन्स हॉटेल आहे. तेथे चौधरी मॅनेजर म्हणून काम करतात.
त्यांच्यासोबत शरीफ माजिद शेख व माजिदुल फैदुल करीम (दोघे रा. पश्चिम बंगाल) हे काम करतात. ते तिघे माळीवाडा परिसरातील रूमवर राहतात. रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर मॅनेजर चौधरी व त्यांच्यासोबत शरीफ शेख व माजिदुल फैदुल करीम रूमवर जात असताना त्यांना रस्त्यावर गाठले. त्यातील एकाने चौधरी यांना चॉपर दाखवून, माझे नाव दया बोराडे व या परिसरातील मी डॉन आहे, तुझा मोबाईल व पैसे मला दे नाहीतर तुला जीवे ठार मारू, असे म्हटला. चौधरींचे साथीदार बाजूला झाले. चौधरी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांच्यावर चॉपरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चौधरी यांनी आरडाओरडा केला असता परिसरातील लोक मदतीसाठी आले. तो पर्यंत हल्ला करणारे तिघे पसार झाले होते.
COMMENTS