आसाममधील कार्बी आंगलाँग जिल्ह्यात चार किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
आसाममधील कार्बी आंगलाँग जिल्ह्यात चार किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
सरमा यांनी ट्विट केले की, 'आसाम पोलिस, श्वान पथक आणि सी-२० सीआरपीएफच्या पथकाने शेजारच्या राज्यातून येणारा ट्रला थांबवून चौकशी केली असता ४.१०९ किलो हेरॉईन जप्त केले. घटनास्थळावरून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.'
कार्बी आंगलाँगचे एसपी संजीब कुमार सैकिया यांनी सांगितले की, रविवारी रात्री ट्रकची सूचना मिळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ड्रायव्हरच्या सीटच्या दरवाजाच्या पॅनलमधून हेरॉइन जप्त करण्यात आले.
COMMENTS