औरंगाबाद/नगर सह्याद्री- राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल मॉडरेटरच्या संपा...
औरंगाबाद/नगर सह्याद्री-
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल मॉडरेटरच्या संपामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे .
२१ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात झाला आहे.पालकांना मुलांच्या निकालाचे वेध लागले आहेत .पण परीक्षा आणि निकालाची वेळ साधत उत्तरपत्रिका तपासणीवर मॉडरेटरचा बहिष्कार आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान बोर्डाकडून राबवण्यात आले . परंतु बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका होत्या.इंग्रजी पेपरमध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाऐवजी चक्क उत्तरच देण्यात आले आहे. दोन प्रश्नांमध्ये प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला सूचना दिल्या आहेत.असा गोंधळ परीक्षा मंडळाने घालून ठेवला आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागणीसाठी मॉडेरेटरनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे .औरंगाबादमधील बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले .या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यासाठी 3 हजार 195 केंद्र उभारण्यात आले आहेत . कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी तब्बल 271 भरारी पथके असणार आहेत. ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी 21 हजार 396 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत .

COMMENTS