जळगाव/ नगर सह्याद्री - प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते असे म्हणतात पण कधीकधी प्रेमाची खात्री पटविणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला ...
जळगाव/ नगर सह्याद्री -
प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते असे म्हणतात पण कधीकधी प्रेमाची खात्री पटविणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात त्यामुळे प्रेम हि भावनाच किती उत्कट आहे याचा प्रत्यय येतो . अशीच घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या गावात घडली आहे. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या दहा तासांनी पतीनेही प्राण सोडला.सिंधुबाई दत्तात्रय वाणी (वय ७५) व दत्तात्रय गणपत वाणी (वय ८५) अशी जोडप्याची नवे आहेत .
सातगाव डोंगरी गावात सिंधुबाई दत्तात्रय वाणी या पती दत्तात्रय गणपत वाणी यांच्यासोबत वास्तव्यास होत्या. मंगळवारी २१ फेब्रुवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास सिंधुबाई वाणी यांचे निधन झाले.शेजारीच एका खोलीत त्यांचे पती दत्तात्रय वाणी सुद्धा आजारपणामुळे अंथरुणावर पडून होते.पत्नीचा मृत्यू झाल्याचे वाणी यांना सांगितले नव्हते.पण सिंधुबाई वाणी यांच्या मृत्यूमुळे मुली रडू लागल्या त्याचा आवाज आल्याने दत्तात्रय वाणी यांना शंका आली. पत्नी आपल्याला सोडून निघून गेली हे त्यांना कळले. त्या क्षणापासून ते गप्प झाले.पत्नीच्या निधनाचा धक्का त्यांना सहन झाला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनीही प्राण सोडला.
COMMENTS