नवी दिल्ली /नगर सह्याद्री - नवी दिल्लीत काँग्रेस नेत्याच्या अटकेसाठी मोठा नाट्यमय प्रसंग घडला.पहिल्यांदा विमानतळावर प्रवाशांनी भरलेली दिल्ल...
नवी दिल्ली /नगर सह्याद्री -
नवी दिल्लीत काँग्रेस नेत्याच्या अटकेसाठी मोठा नाट्यमय प्रसंग घडला.पहिल्यांदा विमानतळावर प्रवाशांनी भरलेली दिल्ली ते रायपूर फ्लाइट रद्द करण्यात आली.नंतर पोलिसांनी त्याच फ्लाइटमध्ये असलेल्या काँग्रेस नेते पवन खेरा यांना विमानतळावरून अटक केली.खेरा हे काँग्रेस नेत्यांसोबत रायपूरला काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी रवाना होत होते.
इतर प्रवाशांची दुसऱ्या विमानाने सोया करण्यात आली.पवन खेरा माहिती देताना म्हणाले विमानात बसल्यानंतर सामान चेक करायचंय, असं सांगण्यात आलं.नंतर डीसीपींना तुम्हाला भेटायचंय त्यामुळे विमानाच्या खाली उतरा, असा बहाणा करण्यात आला . आसाम पोलीसांच्या शिफारशीनंतर ही कारवाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे खेरा यांच्याविरोधात हाफलाँग येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अटक करण्यात आल्याचे आसाम पोलिसांनी सांगितले . पवन खेरा यांच्या अटकेवरून काँग्रेसने तीव्र निषेध केला. सरकारची ही हुकुमशाही असल्याची टीका काँग्रेसने केली.रायपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बाधा आणण्यासाठी असा प्रकार केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
COMMENTS