पाथर्डी / नगर सहयाद्री - मंगळवारपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरु झाली आहे. काल इंग्रजी विषयाचा पेपर होता. पाथर्डीच्या परीक्षा केंद्रावर ए...
पाथर्डी / नगर सहयाद्री -
मंगळवारपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरु झाली आहे. काल इंग्रजी विषयाचा पेपर होता. पाथर्डीच्या परीक्षा केंद्रावर एक अनोखा प्रकार घडला आहे. पाथर्डीतील एका परीक्षा केंद्रावर तर पैसे देऊनही एजंटांनी इंग्रजी विषयाची कॉपी न पुरवल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पेपर सुटताच संबंधित एजंटला चोप दिला.
प्राप्त माहितीनुसार, ‘हमखास उत्तीर्ण होण्याची गॅरंटी’ असलेल्या या केंद्रावर मुंबई-पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. या संस्थेत अॅडमिशनपासून ते निकालापर्यंत सर्व कामे एजंटांमार्फत होतात.त्यासाठी भरभक्कम पैसे घेतले जातात. मंगळवारपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरु झाली असून पहिला पेपर इंग्रजीचा होता. या शैक्षणीक संस्थेने काही विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेत प्रवेश देत पास करून देण्याची हमी देत विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये जमा केले होते.
ठरल्या प्रमाणे विध्यर्थ्यंना कॉपी करता न आल्याने आता ते त्या विषयात नापास होण्याची खात्री झाल्याने आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्या नंतर संताप वैक्त करात आमचे पैसे परत द्या अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करू असा पवित्रा देत वीस ते तीस इयत्ता बारावीचे परजिल्ह्यातील संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित एजंटला मारहाण केली.
काही विद्यार्थी पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले, आपल्यावर गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच संबंधित शैक्षणिक संस्थाचालकाने पालकांची विनवणी करत गुन्हा दाखल करू नका, तुमचे सर्व विद्यार्थी पास होतील व येथून पुढे कोणतीही अडचण येणार नाही अशी विद्यार्थ्यांची समजूत घातल्या नंतर गुन्हा दाखल न करताच दोन तास पोलीस स्टेशनला थांबलेले हे विद्यार्थी व पालक परत गेले.पेपर सुुरू होताच प्रश्नपत्रिका बाहेर येते व तज्ञांकडून त्याची उत्तरे घेऊन ती परीक्षार्थींपर्यंत पोहोवण्याचे काम एजंट करतात.
COMMENTS