अहमदनगर | नगर सह्याद्री- अहमदनगर शहरातील सुप्रसिध्द डॉ. अरुण वैद्य यांच्या घरी शसस्त्र दरोडा घालणार्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक...
अहमदनगर शहरातील सुप्रसिध्द डॉ. अरुण वैद्य यांच्या घरी शसस्त्र दरोडा घालणार्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्याकडून १ लाख ७० हजार ५७० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केले आहे. आकाशसिंग रघुविरसिंग जुन्नी (वय १९), सागरसिंग बलविरसिंग जुन्नी (वय २३, दोघे राहणार संजय नगर झोपडपट्टी, काटवन खंडोबा, अहमदनगर) यांना अटक केली आहे.
सविस्तर असे की १५ फेब्रुवारीला फिर्यादी डॉ. अरुण जगन्नाथ वैद्य कुटूंबियासह झोपलेले असतांना रात्री अडीचच्या सुमारास अनोळखी ६-७ इसमांनी फ्लॅटच्या मुख्य दाराचा कडीकोंडा तोडुन आत प्रवेश केला. फिर्यादी व त्यांची पत्नी यांना कटावणी व लोखंडी रॉडने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच २८ तोळे सोने व हिर्यांचे दागिने, १० लाख रुपये रोख असा २१ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. पोलिस अधिक्षक राकेेश ओला, पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याचा तपास केला.
स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि दिनकर मुंढे, पोसई सोपान गोरे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ मनोज गोसावी, सुरेश माळी, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, पोकॉ सागर ससाणे, मयुर गायकवाड, रोहित येमुल, विजय धनेधर व चापोहेकॉ उमाकांत गावडे यांची दोन विशेष पथके नेमुन आरोपींचा शोध घेत कारवाई केली. पोलीस निरीक्षक कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वैद्य यांचियी घरी मागिल ३-४ वर्षापासबन कामास असलेला आकाशसिंग जुन्नी याने त्यांच्या साथीदारासह हा गुन्हा केला आहे. तो माळीवाड्यात असल्याचे समजताच पोलिस पथकाने तेथे जाऊन शोध घेतला. दोन संशयितांपैकी एकास पोलिसांनी शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडे
COMMENTS