मुंबई/नगर सह्याद्री - अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सांगितले जात होते पण विस्ताराला मुहूर्त मिळताना दिसत नाही . कदाचि...
मुंबई/नगर सह्याद्री -
अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सांगितले जात होते पण विस्ताराला मुहूर्त मिळताना दिसत नाही . कदाचित विस्तार लांबणीवर पडण्याचीच दात शक्यता आहे त्यामुळे शिंदे गटातील आमदार आणि अपक्ष आमदारांमध्ये खदखद सुरु आहे .
मंत्रीमंडळ विस्तारासाठी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नसल्याने विस्तार लांबला आहे.भावी मंत्र्यांची धाकधूक मात्र वाढली आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात होत आहे. त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार सांगत आहेत.मात्र, असं असलं तरी भाजपकडून विस्तारासाठी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाही.
COMMENTS