मुंबई / नगर सहयाद्री - निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असले तरी आता शिंद...
मुंबई / नगर सहयाद्री -
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असले तरी आता शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने पुढचे पाऊल टाकण्यास सुरुवात झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आज पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार असल्याची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर होणाऱ्या या राष्ट्रीय कार्यकारणीच्या पहिल्या बैठकीमध्ये नवीन पदाधिकारी निवडले किंवा नियुक्त केले जाऊ शकतात, अशी माहिती देखील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
वृत्तसंस्थाच्या मह्तीनुसार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेच्या पक्ष प्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात येणार या बाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या पदावर नियुक्ती होवू शकते.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक आमदारांना अद्याप मंत्रीपदी भढती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय कार्यकारणीत सामावून घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
COMMENTS