मुंबई /नगर सह्याद्री - १८२ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेले विमान अचानक झालेल्या बिघाडाने इमरजेंसी लँडिंग करावे लागले.वैमानिकाने प्रसंगावधान दा...
मुंबई /नगर सह्याद्री -
१८२ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेले विमान अचानक झालेल्या बिघाडाने इमरजेंसी लँडिंग करावे लागले.वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने १८२ प्रवाशांचा जिव व्हायला आहे. हा प्रसंग तिरूवंनतपूरम येथे घडला.
कोझिकोड येथून विमानाने उड्डाण घेतले होते.दीड तासाने तिरुवनंतपूरम विमानतळावर त्याचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.केरळच्या कोझिकोडहून दम्माम (सौदी अरेबिया)च्या दिशेने एअर इंडीयाच्या विमानाने सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण घेतलं होतं.विमानातील हायड्रोलिक गियरमध्ये बिघाड झाला. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अचानक हा बिघाड झाला.त्यामुळे विमान तातडीने उतरवले जात असल्याची सूचना देण्यात आली. विमानातील सर्वच प्रवाशांची तारांबळ उडाली. जेव्हा विमान सुरक्षितपणे दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी लँड झालं, तेव्हा प्रवाशांच्या जीवात जीव आला.विमानातील प्रवाशांना दम्मामला घेऊन जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली .
COMMENTS