मुंबई /नगर सह्याद्री - लोकांना अकबर आणि खुनी आक्रमक नादर शाह किंवा बाबरचे पणजोबा तैमूर यांच्यातला फरक समजत नाही. हे लोक इथे लुटायला आले होते...
मुंबई /नगर सह्याद्री -
लोकांना अकबर आणि खुनी आक्रमक नादर शाह किंवा बाबरचे पणजोबा तैमूर यांच्यातला फरक समजत नाही. हे लोक इथे लुटायला आले होते.मुघल इथे लूट करण्यासाठी आले नव्हते त्यामुळे मुघलांचा अपमान कोणी करू नये असे मत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले.
शाह यांची ताज- डिवायडेड बाय ब्लड ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे.यामध्ये त्यांनी राजा अकबरची भूमिका साकारली आहे.मुघलांच्या काळातील राजा-महाराजांचं काम आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांविषयी हि वेबसिरीज आहे.त्यांनी मुघलांविषयी केलेलं वक्तव्य सद्धया चर्चेत आलं आहे. देशात जे काही चुकीचं घडलं ते मुघलांच्या काळात घडलं,असे मानण्यात येते यावर ते म्हणाले, “ हे खूप हास्यास्पद आहे.हा देश आपल घर बनवावा या उद्देशाने मुघल इथे आले होते आणि त्यांनी तेच केलं. त्यांच्या योगदानाला कोणी नाकारू शकतं नाही ?”
मुघल वाईट होते, असा विचार करणं म्हणजे त्यांना देशाच्या इतिहासाची नीट समज नाही असेच वाटते .इतिहासातील त्यांचा काळ आपत्तीजनक आहे म्हणून टाकून देऊ नये.दुर्दैवाने शाळेतील इतिहास हा बहुतांश मुघल आणि इंग्रजांवर आधारित होता. आपला गुप्त वंश, मौर्य वंश, विजयनगर साम्राज्य, अजंताच्या गुहांचा इतिहास किंवा पूर्वोत्तराविषयी आपल्याला माहिती नव्हती. आपण यातील कोणतीच गोष्ट वाचली नाही. आपल्या स्वदेशी परंपरांच्या किंमतीवर मुघलांना मोठं केलं गेलंय. हे खरं आहे पण त्यांना खलनायक बनवण्याची गरज नाही. जर मुघल साम्राज्य वाईट होतं तर त्यांना विरोध करणारे त्यांनी बनवलेल्या स्मारकांना पाडून का टाकत नाहीत. त्यांनी बांधलेला ताज महाल, लाल किल्ला, कुतूब मिनार पाडून टाका.लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानतो, ते मुघलांनी बांधलं होतं असं मत शाह यांनी मांडलं.
टिपू सुलतानलाही खलनायक बनवलं गेलं. इंग्रजांना या देशातून पळून लावण्यासाठी त्याने आपलं सर्व आयुष्य घालवलं आणि आता विचारतात तुम्हाला टिपू सुलतान पाहिजे की राम मंदिर? यात काय लॉजिक आहे? असेही शेवटी ते म्हणाले .
COMMENTS