नगर/नगर सह्याद्री- ३० जानेवारीपासून शनिदेव अस्त अवस्थेत असून होळीला शनिदेवाचा स्वतःच्या कुंभ राशीत उदय होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून राशीच...
३० जानेवारीपासून शनिदेव अस्त अवस्थेत असून होळीला शनिदेवाचा स्वतःच्या कुंभ राशीत उदय होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून राशीचक्रातील १२ राशींपैकी ५ राशींचे भाग्य उदयाला येणार आहे.
ज्योतिष शास्त्रामध्ये शनीचा उदय सकारात्मक मानला जातो, ज्याचा प्रभाव देश आणि जगासह सर्व १२ राशींवर दिसून येतो. होळीपासून ५ राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असेल आणि त्यांची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल.शनीच्या उदयामुळे काही राशीच्या लोकांना होळी सणापासून भरपूर पैसा मिळेल आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.
शनिदेवाच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांची आर्थिक सुधारणांसाठी केलेले उपाय यशस्वी होतील. नोकरदारांची पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या लोकांसाठी शनिदेवाच्या कृपेने होळीपासून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे .
शनिदेवाचा उदय कर्क राशीच्या लोकांसाठीसुद्धा चांगला परिणाम देईल. त्यांच्या अडचणी नशिबाच्या पाठिंब्यामुळे दूर होतील आणि पैसा येऊ लागेल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल.कर्क राशीच्या लोकांना एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ अनुकूल आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी देखील शुभ परिणाम होणार आहे. शनिदेव आणि सूर्यदेवाच्या आशीर्वादाने व्यवसाय सुरू कराल. शनीच्या अस्तामुळे सुरू झालेल्या अडचणीही संपतील आणि रखडलेल्या कामांनाही गती मिळेल.होळीपासून काळ अनुकूल राहील आणि लग्नाचे चांगले प्रस्ताव या लोकांना मिळू शकतात.
धनु राशीच्या लोकांच्याही अनेक समस्या दूर होतील.वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील.आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल.होळीपासून धनु राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या कमी होऊ लागतील,या काळात नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना शनिदेवाच्या कृपेने उत्तम संधी मिळतील.
शनिदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि काही खास लोक भेटतील जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
COMMENTS