अहमदनगर । नगर सह्याद्री- विवाहितेची छेड काढणार्या तरूणाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहिते...
अहमदनगर । नगर सह्याद्री-
विवाहितेची छेड काढणार्या तरूणाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. स्वप्निल संजय काळदाते (रा. दरेवाडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादी घाबरल्याने त्या घराकडे निघून गेल्या. हा प्रकार फिर्यादीच्या दीराने पाहिला. तो काळदाते यांना जाब विचारण्यासाठी गेला असता त्याने फिर्यादीच्या दीराला शिवीगाळ, दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS