मर्चंट बँक निवडणुकीसाठी नगर क्लब येथे जनसेवा पॅनलच्या प्रचारार्थ सभासदांचा मेळावा अहमदनगर । नगर सह्याद्री- अहमदनगर मर्चंटस को ऑफ. बँकेला ...
मर्चंट बँक निवडणुकीसाठी नगर क्लब येथे जनसेवा पॅनलच्या प्रचारार्थ सभासदांचा मेळावा
अहमदनगर । नगर सह्याद्री-
अहमदनगर मर्चंटस को ऑफ. बँकेला उत्कृष्ट कारभाराची मोठी परंपरा आहे. हस्तीमलजी मुनोत यांच्या सारखे दूरदृष्टीचे नेतृत्व बँकेला लाभले आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून बँक सर्वोत्कृष्ट बँकींग सेवा देत सभासद, खातेदार, ठेवीदार यांना मोठा दिलासा देत आहे. मर्चंट बँक जिथे लक्ष्मी वास करे तिथे हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणारे काम विद्यमान सत्ताधारींनी केले आहे. जनसेवा पॅनलचे उमेदवार उच्च शिक्षित आणि तज्ज्ञ आहेत. त्यामुळे सभासदांनी उत्स्फूर्त पणे मतदान करून बँकेच्या भरभराटीत योगदान द्यावे असे आवाहन सभासद अॅड. जयवंत भापकर यांनी केले.
मर्चंट बँक संचालक मंडळ निवडणूकीसाठी सत्ताधारी जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी अहमदनगर क्लब येथे प्रचार बैठक घेऊन भूमिका मांडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ड.्भापकर बोलत होते. याप्रसंगी सभासद सुभाष जग्गी, जितो अहमदनगरचे चेअरमन जवाहर मुथा, एम.जी. रोड व्यापारी असोसिएशनचे शामराव देडगावकर, डॉ. थोलार, जनसेवा पॅनलचे प्रमुख हस्तीमलजी मुनोत, किशोर गांधी, संजीव गांधी, संजय चोपडा, अनिल पोखरणा, सी.ए. मोहन बरमेचा, संजय बोरा, कमलेश भंडारी, सी.ए.आयपी अजय मुथा, अमित मुथा, आनंदराम मुनोत, किशोर मुनोत, प्रमिलाताई बोरा, मीनाताई मुनोत, सुभाष भांड, विजय कोथिंबीरे, बिनविरोध निवड झालेले सुभाष बायड आदींसह सभासद, नगर क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हस्तीमलजी मुनोत यांनी बँकेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की, सभासदांच्या दृढ विश्वास असल्याने बँकेने नेहमीच नेत्रदीपक प्रगती केली आहे. सुरूवातीपासून आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्पर्धा असूनही मर्चंट बँकेने सभासद, खातेदारांच्या मनात घर केले आहे. भविष्यातही हीच परंपरा कायम राखली जाईल. सभासदांनी बँकेच्या हितासाठी उत्स्फूर्त मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. सुभाष जग्गी म्हणाले की, मर्चंट बँकेने उत्कृष्ट कारभारातून नगरच्या अर्थकारणाला चालना देण्याचे काम केले आहे. हस्तीमलजी मुनोत यांचे कुशल नेतृत्व आणि उच्च शिक्षित उमेदवार जनसेवा पॅनलचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मुळेच बँकेचा राज्यात नावलौकिक आहे. बँकेच्या कर्ज योजना, ठेव योजना तसेच सभासद हिताचा कारभार सर्वांना माहिती आहे.
आताची निवडणूक औपचारिकता असली तरी सभासदांनी आवर्जुन मतदान करून जनसेवा पॅनलच्या चांगल्या कारभारावर शिक्कामोर्तब करावे. जवाहर मुथा म्हणाले की, मर्चंटस बँकेने खातेदारांना सुरूवातीपासून आधुनिक बँकींग सेवा सुविधा दिल्या आहेत. तसेच नेहमीच काळानुरूप बदल अंगिकारले आहेत. त्यामुळे सभासद, खातेदारांसाठी मर्चंट बँक हक्काची बँक बनली आहे. सूत्रसंचालन करताना अनिल पोखरणा यांनी बँकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली. सी.ए., आयपी अजय मुथा यांनी आभार मानले.
COMMENTS