व्यवसाय, उद्योग, करियरच्या संधी, बबल थिएटरमध्ये फिल्म फेस्टिव्हल अहमदनगर | नगर सह्याद्री जैन इंटरनॅशनल ट्रेड आर्गनायझ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
जैन इंटरनॅशनल ट्रेड आर्गनायझेशन (जितो)च्या अहमदनगर शाखेच्यावतीने नगर शहरात दि.२५ ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत जितो महाट्रेड फेअर २०२३फ चे आयोजन करण्यात आले आहे. नगर-पुणे रोडवरील केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट समोरील तब्बल १० एकरच्या विस्तीर्ण प्रांगणात हा महाट्रेड फेअर होणार आहे. याठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात आली असून आलिशान टेंट उभारण्यात आला आहे. स्टॉल बुकींगलाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी दररोज विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र तसेच महाराष्ट्र प्रथमच बबल थिएटरच्या माध्यमातून फिल्म फेस्टिव्हलही आयोजित करण्यात आला आहे. नगरच्या विकासाला चालना देणारी महापर्वणी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे, अशी माहिती जितो अहमदनगरचे चेअरमन जवाहर मुथा, प्रोजेट चेअरमन अमित मुथा यांनी दिली.
जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे व्हाईस चेअरमन गौतम मुनोत यांनी सांगितले की, तीन वर्षांनंतर होणारा महाट्रेड फेअर नव्या वर्षात अनेक संधी उपलब्ध करून देणारा राहील. महाट्रेड फेअर मध्ये कृषी, उत्पादने, आय.टी, टेलिकॉम, शिक्षण, ग्राहकोपयोगी उत्पादने, अपना बाजार, टोमोबाईल, बांधकाम साहित्य, रियल इस्टेट, अंतर्गत सजावट, लघु उद्योग, महिलांसाठी घरगुती उद्योगाशी, आधुनिक तंत्रज्ञान, नगरच्या वैद्यकीय क्षेत्राची प्रगती संबधित दालन संबंधित ३५० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. या महाट्रेडच्या माध्यमातून राज्यासह देशातील विविध क्षेत्रातील आस्थापना, कंपन्या, उत्पादक नगरमध्ये येणार आहेत.
यंदा लघु उद्योगांनाही चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बबल थिएटरच्या माध्यमातून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अहमदनगरचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या फिचर फिल्मस, डॉयुमेंटरी पहायला मिळतील. २८ रोजी फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी, कलाकार येणार आहेत. बबल थिएटर नगरकरांसाठी एक विलक्षण अनुभव ठरेल असा विश्वास गौतम मुनोत यांनी व्यक्त केला
COMMENTS