मुंबई । नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीची चर्चा सुरू आहे. या चर्चेवर आता शरद पवार म्हणाले की, या...
मुंबई । नगर सह्याद्री -
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीची चर्चा सुरू आहे. या चर्चेवर आता शरद पवार म्हणाले की, या युतीवर राष्ट्रवादी नाराज असून विरोध करत असल्याचे म्हटले जात होते. मात्र आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: या युतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या काही गटांना आम्ही बरोबर घेणार आहोत, यावर सध्या कोणताही नर्णय झालेला नाही चर्चा सुरू आहे. असे शरद पावारांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडी प्रत्येक मुद्दयावर एकत्रीत निर्णय घेते. त्यामुळे निवडणुकीत एकत्रीत भूमिका घेण्यास कोणातीही अडचण येणार नाही. महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभा या निवडणूकीत एकत्रच असेल असा आमचा प्रयत्न आहे. यात रिपब्लिकन पक्षातील काही गट सहभागी होण्यास इच्छूक आहे. सध्या आम्ही यावर चर्चा करत आहोत. लवकरच अंतिम निर्णय तुमच्या समोर येईल, असे शदर पवार म्हणाले. शरद पवारांनी कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर आपले मत व्यक्त केले आहे. यासह त्यांनी अन्य काही विषयांवर देखील भाष्य केले आहे.
राज्यात सध्या महापूरांषांवरील वक्तव्याने काही नेतेमंडळी चर्चेत आहे. सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यावर शरद पवार म्हणाले की, " मदभेद जर आमच्यात असते, तर ती वेगळी गोष्ट आहे. मात्र सध्या भाजप आणि राष्ट्रवादी, भाजप आणि कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना असा संघर्ष दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष होणारच तो काही थांबणार नाही, असं देखील शरद पवारांनी म्हटले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याने गेल्या महिन्यात राजकारण चांगलचं तापले होते. अशात आपण नाखूश असल्याचं मत राज्यपालांनी व्यक्त केले होते. यावरून देखील शरद पवारांनी राज्यपालांना कोपरखळी दिली आहे. " महाराष्ट्रातल्या राज्यपालांची एक परंपरा आहे. आजवर आम्ही चांगले राज्यपाल पाहिले. मात्र सध्याचे राज्यपाल नाखूश असतील तर आम्हीही सगळे नाखूश आहोत.", असे शरद पवार म्हणाले आहे.
COMMENTS