नाशिक/ नगर सहयाद्री- विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी साठी आज मतदान होत आहे. निवडणुकासाठी पाच जिल्ह्यांत 338 मतदान केंद्र...
नाशिक/ नगर सहयाद्री-
विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी साठी आज मतदान होत आहे. निवडणुकासाठी पाच जिल्ह्यांत 338 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीतील सुरुवातीपासूनच ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिकसह अमरावती पदवीधर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षण मतदारसंघात देखील आज मतदान होणार आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यात मतदान होणार आहे. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक १४७ मतदान केंद्र तर नाशिक जिल्ह्यात ९९ मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.
नाशिक विभागात एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आज बजावणार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १ लाख १५ हजार ६३८ मतदार, नाशिक जिल्ह्यात ६९ हजार ६५२, जळगाव जिल्ह्यात ३५ हजार ५८, धुळ्यात २३ हजार ४१२ तर नंदुरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ मतदार आहेत.नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान, ३३८ मतदान केंद्र तयार
COMMENTS