अहमदनगर । नगर सह्याद्री- बुद्धीची देवता म्हणून श्री गणेशाला सर्वजण पुजन करतात आणि विद्येचे माहेरघर म्हणून पुणे ओळखले जाते. अशा सावित्रीबाई फ...
अहमदनगर । नगर सह्याद्री-
बुद्धीची देवता म्हणून श्री गणेशाला सर्वजण पुजन करतात आणि विद्येचे माहेरघर म्हणून पुणे ओळखले जाते. अशा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून नगरमधील अनेकांनी यापुर्वी चांगले काम करुन नगरचा वेगळा ठसा उमटविला आहे.
आताही निवड झालेले नगरचेच अमोल घोलप हेही त्यात भर घालतील. तसेच केमिस्ट असोसिएशनचे नूतन अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी कमी कालावधीत असोसिएशनसह सामाजिक क्षेत्रात सुरु असलेले योगदान हे सर्वश्रुत आहे. अशा समाजशिल व्यक्तीमत्वांच्या चांगल्या कामास श्री विशाल गणेशाचे आशिर्वाद नेहमीच पाठिशी राहतील, असा विश्वास श्री विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या सिनेट सदस्यपदी नगर मधील उद्योजक अमोल घोलप यांची निवड झाल्याबद्दल तसेच केमिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ता गाडळकर यांची निवड झाल्याबद्दल शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देतांना अमोल घोलप म्हणाले, श्री विशाल गणेशाच्या आशिर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने आपली पुणे विद्यापीठावर निवड झाली आहे. या मिळालेल्या संधीचा उपयोग विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करु, नगरमधील विद्यापीठाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले.दत्ता गाडळकर म्हणाले, संघटनेत काम करतांना सामाजिक दायित्व जपून आपले कार्य सुरु असून, यासाठी आपणास अनेकांचे सहकार्य व पाठबळ मिळत आहे.
सर्वांच्या सदिच्छांमुळे आपणास मिळालेल्या पदाच्या माध्यमातून चांगले काम करु, असे सांगितले. यावेळी अमोल घोलप व दत्ता गाडळकर यांच्या हस्ते श्री विशाल गणेशाची आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कानडे यांनी केले तर आभार विजय कोथिंबीरे यांनी मानले.
COMMENTS