मुंबई / नगर सहयाद्री - आज मुंबईत सकल हिंदू सामाजामार्फत हिंदू जनआक्रेश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लव्ह जिहाद प्रकरणी कायद्याची अंमलबजाव...
मुंबई / नगर सहयाद्री -
आज मुंबईत सकल हिंदू सामाजामार्फत हिंदू जनआक्रेश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लव्ह जिहाद प्रकरणी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपच्या काही नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. धर्मांतराच्या बाबतीत आक्रमक होत कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
एका वृत्त संस्थाच्या माहिती नुसर "धर्मांतराच्या बाबतीत कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तरुण मुलींना अमिष दाखवून फसवण्याचे प्रकार घडतात ते रोखणे गरजेचे आहे. नगर जिल्ह्यात लव्ह जिहादच्या घटनेत मोक्का लावण्याचा सूचना आम्ही यापूर्वी दिल्यात. अशा प्रवृत्तींवर कायद्याच्या चाकोरीत बसून कडक कारवाई झाली पाहिजे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांपर्यंत हा अहमदनगर जिल्हा शत प्रतिशत भाजपमय होईल यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सर्वे बाबत बोलताना ते म्हणाले की, "हा प्री मॅच्युअर सर्वे आहे. गेल्या सहा महिन्यात नवीन सरकार राज्यात आले. टोळीचं राज्य असलेलं सरकार निघून गेलंय आणि जनतेचं राज्य आलय. भाजपचे ४५ प्लस हे मिशन निश्चितपणे गाठू, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
COMMENTS