पुणे : बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन करणार्यांवर गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाई केली आहे. गेल्या वर...
पुणे : बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन करणार्यांवर गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात संबंधितांवर १८७० गुन्हे दाखल केले असून २००६ आरोपींना अटक केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामध्ये ही बाब समोर आली आहे. मद्याची अवैध निर्मिती, वाहतूक आणि विक्री यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाया केल्या आहेत. कारवाईत २०० पेक्षा जास्त चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त केली आहेत. तसेच या कारवायांमधून १२ कोटी २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.
COMMENTS