मुंबई । नगर सह्याद्री - उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.उर्फीने आता ट्विट करत सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. उर...
मुंबई । नगर सह्याद्री -
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.उर्फीने आता ट्विट करत सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. उर्फीच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच तिच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. उर्फी आणि चित्रा वाघ यांचा वाद वाढत आहे. उर्फीने चित्रा वाघ यांना ग्रेट म्हटले आहे. परंतु यावेळी तिने केलेल्या या पोस्टमुळे प्रचंड वाद चिघळण्याची शक्यता आहे.
उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये सुरू झालेला शाब्दिक वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. उर्फी ट्विटरवरून चित्रा वाघ यांच्या विरोधात सतत ट्विट करत आहे. उर्फी तिचे फोटो पोस्ट करून त्यात चित्र वाघ यांना टॅग करत आहे.
काल केलेल्या एक पोस्टमध्ये उर्फीने 'मेरी DP इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू' असे म्हटले होते. त्यानंतर उर्फीने पुन्हा एक ट्विट केले आहे. 'उर्फी की अंडविअर मे छेद है, चित्रा ताई ग्रेट है' असे ट्विट उर्फीने केले आहे. उर्फीने या ट्विटमध्ये स्वतःच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत चित्रा वाघ यांना महान म्हटले आहे.
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू आहे. या वादात अनेक राजकारण देखील झाले आहे. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाकडे उर्फी विरोधात तक्रार देखील दाखल केली होती. महिला आयोगाने चित्रा वाघ समाजात धर्माविरोधात असंतोष पसरवत आहेत असे म्हणत त्यांना नोटीस पाठवली आहे.
'उर्फी जे करतेय ते वावगं नाही' असं म्हणत अमृता फडणवीस यांनी उर्फीचे समर्थन देखील केले आहे. आता हा वाद कधी थांबणार? यात अजून काय पाहायला मिळणार हे येत्या काळात आपल्याला कळेल.
COMMENTS