कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आऊटर रिंग रोडवर बांधकामाधीन मेट्रोचा खांब पडून महिला आणि तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील आऊटर रिंग रोडवर बांधकामाधीन मेट्रोचा खांब पडून महिला आणि तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पिलरच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारा टीएमटीचा बार त्यांच्या स्कूटरवर पडल्याने ही घटना घडली. स्तंभाची उंची ४० फुटांपेक्षा जास्त आणि वजन काही टन असल्याचे सांगितले जाते. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने मृतांना जवळच्या रुग्णालयात नेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, बेंगळुरूमध्ये मेट्रोचा खांब कोसळला. हा '४०% कमिशन' सरकारचा निकाल आहे. विकासकामांमध्ये गुणवत्ता नाही. लोकांचा या सरकारवरील विश्वास उडत चालला आहे. सर्वत्र भ्रष्टाचार आहे.
COMMENTS