मुंबई / नगर सहयाद्री- राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत समुद्रातून बोटमधून प्रवास करत असताना भर समुद्रात बोट बंद पडली. अचानक ओढवलेल्या या सं...
मुंबई / नगर सहयाद्री-
राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत समुद्रातून बोटमधून प्रवास करत असताना भर समुद्रात बोट बंद पडली. अचानक ओढवलेल्या या संकटात प्रसंगावधान राखत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वीय सहायकाने दुसरी स्पीड बोट बोलवली. सुदैवाने उदय सामंत हे सुखरूप आहे.
एका वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार राज्याचे आरोग्यमंत्री उदय सामंत हे रायगडमधून गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने स्पीड बोटमधून प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या स्पीड बोटीचे अचानक इंजिन बंद पडले. त्यामुळे समुद्रातील लाटांमुळे त्यांची बोट भरकटली. बोट बंद पडल्यामुळे बोटीच्या सर्व यंत्रणा देखील बंद पडल्या.
त्यामुळे बोटीच्या कॅप्टनला तात्काळ SOS हा आपत्कालीन संदेश सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवणे कठीण झाले होते. समुद्रात अचानक ओढवलेल्या या संकटात प्रसंगावधान राखत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वीय सहायकाने दुसरी स्पीड बोट बोलवली.
COMMENTS