नवी मुबंई वृत्तसंस्था वांद्रेहून जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचे तब्बल ८ डबे रुळावरून घसरले आहेत.या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित...
नवी मुबंई वृत्तसंस्था
वांद्रेहून जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचे तब्बल ८ डबे रुळावरून घसरले आहेत.या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.मात्र, सुमारे दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत.
“मारवाड जंक्शनवरून निघाल्यानंतर ५ मिनिटांत ट्रेनच्या आत कंपनाचा आवाज आला.त्यानंतर दोन ते तीन मिनिटांनी ट्रेन थांबली.स्लीपर क्लासचे ८ डबे रुळावरून खाली घसरलेले दिसले.अपघातानंतर १० ते १५ मिनिटातच रुग्णवाहिका तेथे आली.या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत.
वांद्रेहून जोधपूरला निघालेली सूर्यनगरी एक्सप्रेस पाली येथील राजकीयावासाजवळ आली असता, एक्सप्रेसचे ८ डबे रेल्वेरूळावरून घसरले.या दुर्घटनेत जवळपास १० ते १५ प्रवाशी जखमी झाले.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
COMMENTS