मुंबई / नगर सहयाद्री- सकाळी घाईगर्दीच्या वेळेत अनेकजण कामावर जाण्याच्या घाईत असतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत असतात. अशाच एका अपघातात बो...
मुंबई / नगर सहयाद्री-
सकाळी घाईगर्दीच्या वेळेत अनेकजण कामावर जाण्याच्या घाईत असतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत असतात. अशाच एका अपघातात बोरिवली रेल्वे स्थानकात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. ही शिक्षिका मालाड येथील शाळेत जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्रगती घरत (४३) असं या शिक्षिकेचं नाव आहे. १० जानेवारीला बोरिवली रेल्वे स्थानकात त्यांचा अपघात झाला होता. प्रगती घरत या मालाड येथील एका शाळेत शिक्षिका होत्या. त्या वसई इथं राहत होत्या. त्या दरदिवशी मालाडला जाण्यासाठी बोरिवली येथून स्लो ट्रेन पकडत असत. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या बोरिवली स्थानकावर उतरल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून सुटणाऱ्या चर्चगेट ट्रेनच्या सेकंड क्लासच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. मात्र, ट्रेन नुकतीच सुरू झाली होती. ती पकडण्याच्या नादात त्यांचा पाय घसरला आणि त्या प्लॅटफॉम व ट्रेनच्या मधील मोकळ्या जागेत अडकल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.
पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरिवली स्थानकावरुन नुकतीच सुरू झालेली लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना खाली पडून जखमी झालेल्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि राहत असलेल्या परिसरात समजली, त्यावेळी हळहळ व्यक्त करण्यात आली.
COMMENTS