रत्नागिरी / नगर सहयाद्री- खेड आंबवली मार्गावरील कुडोशी येथील स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात जिल्हा पर...
रत्नागिरी / नगर सहयाद्री-
खेड आंबवली मार्गावरील कुडोशी येथील स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुषमा निकम (वय ५५ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
एका वृत्त संस्थाच्या मिळालेल्या माहितीनुसार मोहाने जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षिका सुषमा निकम या शाळा सुटल्यानंतर एका दुचाकीच्या मागे बसून आपल्या भरणे बाईतवाडी येथील घरी परतत होत्या. अचानक त्यांची दुचाकी कुडोशी येथील गतिरोधकावर आदळली.यामध्ये निकम ह्या उंच उडून रस्त्यावर आदळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी मृत झालेल्या निकम यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अपघात होऊन एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS