विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले की, 'द काश्मीर फाइल्स' १९ जानेवारीला पुन्हा रिलीज होत आहे. तो दिवस म्हणजे काश्मिरी हिंदू नरसंहार दिन.
२०२२ मधील बहुचर्चित चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपल्या चित्रपटाविषयी मोठी घोषणा केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की त्यांचा चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करणार आहे.
त्याचवेळी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनीही या चित्रपटाबद्दल ट्विट केले आहे. अनुपम खेर यांनीही या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून पुन्हा रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत लिहिले की, 'काश्मिरी पंडितांच्या निर्गमनाला ३३ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आणि लोकांच्या मागणीनुसार हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी कृपया उद्या 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट पहा.'
'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट गेल्या वर्षी ११ मार्च २२०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ २० ते २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३४० कोटींहून अधिक कमाई केली. १९९० मधील काश्मिरी हिंदूंचे पलायन या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्या हत्याकांडाची कहाणीही सांगितली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
COMMENTS