मुंबई : गौतमी पाटील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्यावर अश्लील डान्स करत असल्याची टीका होत आहे. तिच्या डान्स शोवर बंदी घालण्याची मागली अन...
मुंबई : गौतमी पाटील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्यावर अश्लील डान्स करत असल्याची टीका होत आहे. तिच्या डान्स शोवर बंदी घालण्याची मागली अनेक वेळा करण्यात आली आहे. तिच्या डान्स शोचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडिया व्हायरल होत असतात. गौतमीच्या कार्यक्रमामध्ये बर्याचदा गदारोळ झाल्याचे आपण पाहिले आहे. गौतमीच्या कार्यक्रमाचा आणखी एक असाच व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील शिरूर तालुयातील कवठे येमाई येथे गौतमीचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एक तरुणाने घुडघूस घातल्याचे पाहायला मिळाले आहे. गौतमी स्टेजवर डान्स करत असताना मंचावरील एका तरुणाने तिच्या बाजूला फटका लावण्याचा प्रयत्न केला. तरुणाचे हे कृत्य पाहून गौतमीने लगेच तिचा डान्स थांबवला. त्वरित आयोजकांनी त्या तरुणाला बाजूला केले. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. गौतमी डान्स करत असताना एक तरुण तिथे फटका लावत होता. हे पाहून गौतमीने लगेच डान्स थांबला आणि ही घटना आयोजकांच्या लक्षात आणून दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. गौतमीच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा विघ्न आले आहे. तिच्या कार्यक्रमामध्ये अनेकदा विचित्र प्रकार घडल्या आहेत. कधी तरुणाने थेट स्टेजवर धाव घेतली आहे. तर कार्यक्रमादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साम टीव्हीवर झालेल्या एका मुलाखतीमध्ये गौतमीने तिच्यावर झालेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
COMMENTS