मुंबई / नगर सह्याद्री - काश्मिरातील बर्फवृष्टी, उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेले पश्चिमी चक्रवात यामुळे सोमवारी (दि. ९) महाराष्ट्रातील सुमा...
मुंबई / नगर सह्याद्री -
काश्मिरातील बर्फवृष्टी, उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेले पश्चिमी चक्रवात यामुळे सोमवारी (दि. ९) महाराष्ट्रातील सुमारे १३ जिल्ह्यांतील किमान तापमानात ५ ते ६ अंशांची घट झाली. राज्यातील १९ शहरांतील किमान तापमान १० अंशांपर्यंत नोंदले गेले.
नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे सर्वात नीचांकी ४.७, निफाड, जळगाव, धुळ्यात ५ अंश एवढे तापमान नोंदले गेले. औरंगाबादेत ५५ वर्षांनंतर सर्वात कमी ५.७ अंश नोंद झाली. यापूर्वी १९६८ मध्ये ५.२ अंश, तर २९ डिसेंबर २०१८ रोजी ५.८ नीचांकी तापमान होते. सोमवारी ८.७ अंशांपर्यंत पारा घसरल्याने नाशिकमध्ये सकाळी नऊपर्यंत दाट धुयाची चादर होती. पुढील ४८ तास म्हणजे मंगळवार व बुधवारीही किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी आणखी घसरेल. मुंबई तसेच कोकण वगळता संपूर्ण राज्यात १९ जानेवारीपर्यंत कडायाची थंडी पडेल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
उत्तर भारतातील काश्मीर, लडाख, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच राजस्थानात पश्चिमी चक्रवातामुळे थंडी कमी-अधिक होत आहे. दोन दिवसांपासून किमान तापमानात घसरण झाल्याने आणि दाट धुके पसरल्याने कडायाची थंडी जाणवली. सोमवारी थंड वार्याचा वेग कमी होता, पण तापमान कमालीचे घसरले. पुढील ४८ तासांत हेच चित्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
COMMENTS