सुशांतच्या पाळीव कुत्रा 'फज'नेही या जगाचा निरोप घेतला आहे. प्रियंका सिंगने तिच्या सोशल मीडियावर ही बातमी चाहत्यांना कळवली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाला जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. चाहते अजूनही त्याची खुप आठवण काढतात आणि अनेकदा त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. आता बातमी आली आहे कि, सुशांतच्या पाळीव कुत्रा 'फज'नेही या जगाचा निरोप घेतला आहे. दिवंगत अभिनेत्याची बहीण प्रियंका सिंगने तिच्या सोशल मीडियावर ही बातमी चाहत्यांना कळवली आहे.
सुशांतची बहीण प्रियांकाने सोशल मीडियावर आपल्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूची बातमी शेअर केली आहे. प्रियांकाने लिहिले की, 'फज खूप दिवसांपासून एकत्र होता, तू तुझ्या मित्राच्या स्वर्गीय क्षेत्रात सामील झाला आहे, प्रत्येकाला एक दिवस तिथे जायचे आहे, आम्ही सुद्धा येऊ! तोपर्यंत... सध्या मन खूप उदास आहे.'
प्रियांकाच्या ट्विटनंतर लगेचच सुशांतच्या अनेक चाहत्यांनी फजच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. एका यूजरने लिहिले की, 'दी, कृपया मजबूत रहा, मला काय बोलावे ते समजत नाही.' आणखी एका युजरने लिहिले की, 'काही सांगण्यासारखं नाही, ही आपल्या सर्वांसाठी खूप हृदयद्रावक बातमी आहे, पण तो सुशांतचा खरा मित्र आहे आणि त्याच्यासोबत आनंदाने राहायला गेला आहे.' दुसर्या यूजरने लिहिले की, 'मी किती तुटलो आहे हे व्यक्त करू शकत नाही. या बातमीने माझे हृदयाचे पुन्हा एकदा लाखो तुकडे झाले.'
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कूपर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने दावा केला होता की, सुशांत सिंह राजपूतची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून, ज्येष्ठ अभिनेते शेखर सुमन यांच्यासह अनेक कलाकारांनी मृत्यू प्रकरण पुन्हा उघडण्याची मागणी केली. यानंतर सुशांतच्या बहिणीने चाहत्यांना सुशांतला न्याय देण्याची विनंती केली आहे.
COMMENTS