मुबंई / नगर सहयाद्री- समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकेत समलि...
मुबंई / नगर सहयाद्री-
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकेत समलिंगी विवाहाला विशेष विवाह कायद्यांतर्गत आणण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
पश्चिम बंगाल चे सुप्रियो चक्रवर्ती आणि दिल्लीचे अभय डांग यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे. हे दोघंही १० वर्षापासून सोबत राहतात. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी हैदराबाद इथं लग्न केलं आहे. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या विवाहाला स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली परवानगी द्यावी.
भारतीय कायद्यानुसार समलैगिंक व्यक्तींना लग्नाची परवानगी नाही.या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्याला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
COMMENTS