सुकेश म्हणाला की, 'तिने माझ्याकडे एक कार मागितली होती आणि मी तिला ती भेटही दिली होती. याचे पुरावे मी ईडीला आधीच दिले आहेत.'
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस ठग सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या प्रकरणी एक नवीन अपडेट समोर येत आहे. यापूर्वी नोरा फतेहीने दावा केला होता की सुकेशने तिला आपली गर्लफ्रेंड बनवून लक्झरी लाइफस्टाइल देण्याचे वचन दिले होते. या प्रकरणी सुकेश याने आपले निवेदन जारी केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेशचे म्हणणे आहे की, 'नोराला मोरोक्कोमध्ये घर घेण्यासाठी त्याने तिला पैसे दिले होते. तिने मोरोक्कोमधील कॅसाब्लांका येथे तिच्या कुटुंबासाठी घर घेण्यासाठी माझ्याकडून आधीच मोठी रक्कम घेतली होती. आता ती स्वत:ला वाचवण्यासाठी खोटे बोलत आहे.'
सुकेश पुढे म्हणाला, 'आता नोरा म्हणत आहे की तिला कार नको होती, हे सर्वात मोठे खोटे आहे. तिला तिची कार बदलायची होती आणि तिला मर्सिडीज सीएलए कार स्वस्त वाटायची. तिने माझ्याकडे एक कार मागितली होती आणि मी तिला ती भेटही दिली होती. याचे पुरावे मी ईडीला आधीच दिले आहेत.' सुकेशने असेही सांगितले की, 'त्याच्याकडे नोरासोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट्सही होते, त्याला तिला रेंज रोव्हर कार द्यायची होती, पण त्यावेळी ती कार स्टॉकमध्ये नव्हती आणि तिला लगेच कार हवी होती. म्हणूनच मी बीएमडब्ल्यूची एस सीरिजची कार दिली. आणि तिने बराच वेळ कार वापरली.'
COMMENTS