मुंबई / नगर सहयाद्री - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता सुधीर वर्माने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुधीर वर्माने 23 जानेवारी र...
मुंबई / नगर सहयाद्री -
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता सुधीर वर्माने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुधीर वर्माने 23 जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. सुधीरच्या निधनाने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा परसली आहे.
सुधीर वर्मा यांचे सहकलाकार असलेले अभिनेते सुधाकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे. सुधाकरने ट्विटरवर सुधीर वर्माचे अनेक फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सुधीर वर्माने उचलेल्या टोकाच्या पावलाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की सुधीर काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होता.
टॉलिवूड अभिनेता सुधीर वर्माने 2013 मध्ये 'स्वामी रा रा' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर तो 2016 मध्ये कुंदनपू बोम्मा या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातून सुधीर वर्माला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यांने तेलुगू चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्यानंतरही अभिनेत्याला चित्रपटांच्या ऑफर्स मिळत नव्हत्या. काम न मिळाल्याने तो डिप्रेशनमध्ये गेला.
COMMENTS