सुधीर तांबे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन पाऊल टाकल्याने तांबेंना हिसका नाशि...
सुधीर तांबे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन पाऊल टाकल्याने तांबेंना हिसका
नाशिक / नगर सहयाद्री-
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी पक्षाने एबी फॉर्म देऊनही उमेदवारी अर्ज न भरणाऱ्या डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसकडून तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे, अशी आशा सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष याप्रकरणाची चौकशी कधीपर्यंत पूर्ण करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यानच्या काळात सुधीर तांबे काही वेगळा निर्णय घेतील का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाचा एबी फॉर्मही सुधीर तांबे यांना देण्यात आला होता. परंतु, शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना सुधीर तांबे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तांबे पितापुत्रांच्या या अनपेक्षित खेळीमुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे अधिकृत उमेदवार होते. पक्षाने त्यांना एबी फॉर्म देखील दिली होता. मात्र शेवटच्या क्षणी तांबे कुटुंबियांना राजकीय खेळी केली. सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असताना देखील उमेदवारी दाखल केली नाही.त्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. सुधीर तांबे यांनी पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतली. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या परवानगीने की कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे अधिकृत उमेदवार होते. पक्षाने त्यांना एबी फॉर्म देखील दिली होता. मात्र शेवटच्या क्षणी तांबे कुटुंबियांना राजकीय खेळी केली. सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असताना देखील उमेदवारी दाखल केली नाही.त्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
COMMENTS