नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे यांचं अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यां...
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे यांचं अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याबाबतची माहिती दिली.
नाशिक / नगर सहयाद्री-
नाशिक पदवीधर संघातून एक मोठी बातमी हाती आली आहे. निवडणुकीसाठी बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे यांचं अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याबाबतची माहिती दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेतली, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. या पत्रकार परिषदे मध्ये काँग्रेसकडून नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थिती होते.
मिळालेल्या माहिती नुसार सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच या निवडणुकीत नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे.
सत्यजीत तांबे यांचं निलंबन
आजच्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांचं निलंबन करण्यात अल्याचं सांगितलं. "तांबे परिवाराचं काय झालं याच्याशी आम्हाला आता काही भाष्य करायचं नाही. त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं आहे. थोरात साहेब आमचे नेते आहेत. ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्याशी आम्ही नंतर चर्चा करु. त्यांची काय भूमिका आहे ते पाहू. मात्र सध्या सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित केलं आहे", असं नाना पटोले म्हणाले.
शुभांगी पाटील यांना पाठिंबा
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने अधिकृतपणे शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. नाशिक आणि अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकणात शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. यासाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. तर, दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
COMMENTS