पुणे / नगर सहयद्रि- फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व अन्य पूर्ण तयारी माध्य...
पुणे / नगर सहयद्रि-
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व अन्य पूर्ण तयारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. तर यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा तेथे केंद्र असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे होणाऱ्या परीक्षा सन 2020 पूर्वी जशा घेतल्या होत्या, त्या पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
कोरोना प्रादुर्भावामुळे 2021 मध्ये दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढे 2022 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम होता. त्यामुळे विशेष निर्णय घेऊन परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
शाळा तेथे केंद्र (होम सेंटर), 25 टक्के कमी अभ्यासक्रम, याशिवाय उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात आला होता. मात्र यावेळी होम सेंटर रद्द करण्यात आले आहे, 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे, तसेच अधिकचा वेळ देखील मिळणार नाही.
COMMENTS