मुंबई- अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या ’बांबू’ (इरालेे) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण ...
मुंबई-
अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या ’बांबू’ (इरालेे) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. दरम्यान, सिद्धार्थ जाधवने पोस्ट शेअर करत तेजस्विनी पंडितला शुभेच्छा दिल्या. तो म्हणतो, तेजस्विनी पंडित अर्थात ’बंड्या’ तू एक उत्तम अभिनेत्री आहेस. तुला जेव्हा संधी मिळाली, तेव्हा अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहेस. आज निर्माती म्हणून तू लोकांसमोर येत आहेस, ही अभिमानाची गोष्ट आहे. ’बांबू’च्या माध्यमातून निर्माती म्हणून तुझं नाव रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
माझी मैत्रिण आयुष्यात एक एक गोष्ट स्वत:च्या हिमतीवर मिळवतेय याचा विलक्षण आनंद आहे. ’बंड्या’, ’येरे येरे पैसा’ सिनेमातला सन्नी बबलीला म्हणतो बबली, तू बडी हो गई रे, त्याचप्रमाणे हा तुझा मित्र बंड्या तुला म्हणतोय, तेजू तू बडी हो गई रे. आयुष्यात तू अजून खूप मोठी हो, एवढ्याच शुभेच्छा. आय लव्ह यू बंड्या. मला माहिती आहे तू बोलशील मी तुला त्या नजरेने कधी पाहिलंच नाही; पण तरीही आय लव्ह यू.
सिद्धार्थच्या या पोस्टवर तेजस्विनीने आभार मानत लिहिले, ‘थँक यू’ हा छोटा शब्द आहे. खरंतर माझी धावपळ, स्ट्रगल, स्ट्रेस आणि माझ्या आनंदाच्या क्षणांचा तू कायम साक्षीदार होतास. तू माझा हात घट्ट धरुन उभा राहिलास. निस्वार्थपणा आपल्या इंडस्ट्रीत क्वचितच आढळतो. त्यामुळे तुझ्यासारखा मोठा तूच! बाकी काही कमावलं की, नाही माहिती नाही. पण, तुझ्यासारखा मित्र कमावला.
COMMENTS