शिर्डीच्या सहकार गौरव सोहळा पुरस्कार प्रदान पारनेर / नगर सह्याद्री - तालुक्यातील वासुंदे येथील पतसंस्था क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक व भर...
पारनेर / नगर सह्याद्री -
तालुक्यातील वासुंदे येथील पतसंस्था क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक व भरारी श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेला सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल "सर्वोत्कृष्ट संस्था२०२२" पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे यांनी दिली आहे.
शिर्डी येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय सहकार गौरव सोहळा २०२२ कार्यक्रमामध्ये श्री गुरूदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेस बँकिंग व सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल दिला जाणारा *सर्वोत्कृष्ठ संस्था पुरस्कार २०२२* रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक.सतिष मराठे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री. उदयजी जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष. काकासाहेब कोयटे फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे व संचालक मंडळाने पुरस्कार स्विकारला आहे.
या संस्थेने ग्राहकांना मुख्य कार्यालयासह आठ शाखांच्या माध्यमातून सर्व प्रकाराच्या अत्याधुनिक बँकिंग व अन्य आवश्यक सेवा ग्राहकांना उपलब्ध झाल्याने संस्थेविषयीची विश्वासहर्ता वाढण्यास या सेवांमुळे मदत होऊन संस्थेंच्या व्यवसायामध्ये वाढ होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे संस्थेच्या अल्पावधीतच ठेवी १०६.५३ कोटी व कर्जे वाटप ८६.५२ कोटी तर बँक गुंतवणुक २६.४७ कोटी केलेली आहे. संस्थेनें ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांसह, सुशीक्षित बेरोजगारांना वाहन तारण कर्ज ,उद्योग व्यवसायिकांसाठी अर्थसहाय्य केलेले आहे.
संस्थेच्या जडणघडणीत,विकास कार्यात,प्रगती व गुणवत्तेमध्ये बळकटी आणण्यासाठी सभासद, संचालक मंडळ,कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.कुठत्याही सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन व कर्मचारी हे एकाच रथाची दोन चाके असतात,संचालक मंडळ व कर्मचारी यांनी सभासदांचे हित जोपासत प्रामाणिकपणे काम केल्यास संस्थेची प्रगती निश्चित होते,याच चांगल्या कामाची प्रचीती व जाणीव संस्थेस मिळणाऱ्या पुरस्कारामधून येत असल्याचे प्रतिक्रिया बा.ठ.झावरे यांनी दिली. सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासस तडा जाऊ न देता संस्था प्रगती वर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष बा.ठ.झावरे यांनी सांगितले.
COMMENTS