मुंबई । नगर सह्याद्री - देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. दिल्लीच्या श्रद्धा वालकरचा तिचा प्रियकर आफताब पुनावाला...
मुंबई । नगर सह्याद्री -
देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. दिल्लीच्या श्रद्धा वालकरचा तिचा प्रियकर आफताब पुनावालाने याने खून करत ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले होते. ज्यानंतर रोज नवनव्या खुलाशाने पोलिसही चक्रावून गेले होते. संपूर्ण देशाला हादरवुन टाकणाऱ्या दिल्लीच्या श्रध्दा वालकर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या प्रकरणी दिल्ली पोलीस लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी यासाठी आरोपपत्राचा मसुदाही तयार केला आहे. जानेवारीच्या अखेरीस कोणत्याही तारखेला आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते.
श्रद्धा हत्या प्रकरणाची पोलिसांनी ३ हजार पानांचे आरोपपत्र तयार केली आहे. आरोपपत्रात १०० लोकांचे स्टेटमेन्ट घेण्यात आले आहेत. तसंच पुरावे म्हणून इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक विभागाने दिलेले अहवाल जोडले आहे. ३ हजार पानांचे मसुदा आरोपपत्र अंतिम आरोपपत्राचा मुख्य भाग बनण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी आरोपपत्रात आफताबचा कबूलनामा त्याच्या नार्को टेस्टच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल जोडण्यात आला आहे. या महिन्याच्या शेवटी पोलीस ही चार्जशीट न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS