मुंबई । नगर सह्याद्री - राज्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण सुनावणी आज होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चाललेल्या सत्तासंघर्षावर आज (१०, ज...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण सुनावणी आज होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चाललेल्या सत्तासंघर्षावर आज (१०, जानेवारी) रोजी न्यायालयात सुनावणी होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटांसाठी ही सुनावणी महत्वाची ठरणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण सुनावणी आज होणार आहे. त्याआधी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "कोणत्याही दबावाखाली न येता हा खटला चालवला जावा, स्वायत्त संस्था कोणत्याही दबावाखाली येवू नये. तसेच या देशात न्याय व्यवस्था आहे की नाही हे या केसवरुन दिसून येईल. न्यायालयाकडे आम्ही सत्याच्या पलिकडे काहीच मागत नाही."
यावेळी एक मोठी महाशक्ती पाठीशी असल्यानेच हे सरकार आले असून घटनाबाह्य सरकार मिश्किलपणे हसत आहे. पण आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. हा निकाल पहिल्याच दिवशी लागला असता, मात्र आता फेब्रूवारीपर्यंत हा निकाल लागणे अपेक्षित आहे असेही राऊत म्हणाले.
यावेळी भाजपावर निशाणा साधताना त्यांनी शिवसेना फोडणे हे शरद पवारांचे स्वप्न नव्हते तर ते भाजपचं होतं. शिवसेनेचे दोन तुकडे करायचे हे राष्ट्रीय धोरण भाजपचं आहे. या कटात चाळीस खोके वाले सामिल झाले आहे. असा घणाघातही त्यांनी केला.
भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना त्यांनी पंजाबमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचेही सांगितले. त्याचबरोबर राहुल गांधी एक तपस्वी आहेत. त्यांची भारत जोडो यात्रा म्हणजे एक इव्हेंट नाही तर ऐतिहासिक घटना आहे, अशा शब्दात त्यांनी यावेळी राहुल गांधींचे कौतुक केले.
COMMENTS