सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी नजीकच्या गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूल शाळेचे सात विद्यार्थी, महाराष्ट्र राज्य परीक्षा पर...
पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी नजीकच्या गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूल शाळेचे सात विद्यार्थी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. पाचवी) गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
एकच ध्यास ... गुणवत्ता विकास. या उपक्रमांतर्गत २१ विद्यार्थी या परीक्षेला २०२१-२२ शैक्षणिक वर्षात बसले होते. पैकी १९ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
शिस्त, संस्कार, गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि दर्जेदार शिक्षण हे ब्रीद वाय घेऊन ग्रामीण भागातील मुलांमधील गुणवत्ता या शाळेने पुन्हा एकदा अधोरेखित करत, यशाची परंपरा कायम राखली आहे. यापूर्वीही दरवर्षी या शाळेचे अनेक मुले शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यामुळे सुपा परिसरात गुणवत्ता म्हणजे गुरुदेव असे समीकरण झाले आहे.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य अविनाश भिंगारदिवे, विस्तार अधिकारी शोभा मगर हे तज्ञ मार्गदर्शक लाभले. गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारे विद्यार्थी गौरव मंगेश गवळी - २६२ गुण, आदित्य पंकज विश्वकर्मा - २५६ गुण, सार्थक श्रीकांत येणारे -२४० गुण, समीक्षा गणेश गरजे -२३२ गुण, साई विकास ठोकर -२३० गुण, साई दत्तात्रय डोईफोडे- २२२ गुण, प्रणव प्रदीप रसाळ- २२२ गुण.
सर्व विद्यार्थ्यांचे आमदार निलेश लंके, माजी सभापती दिपक पवार, सुपा सरपंच मनीषाताई योगेश रोकडे,सरपंच वाघुंडे खुर्द रेश्माताई पवार तसेच संस्थेचे संस्थापक सुभाष मगर यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS