कान्हूरपठार | नगर सह्याद्री महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणार्या शिष्यवृत्ती परीक्षेत पारनेर तालुक्यातील कान...
कान्हूरपठार | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणार्या शिष्यवृत्ती परीक्षेत पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनताविद्या मंदिर शाखेतील इयत्ता ८ वी च्या पाच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गुणवत्तायादीत निवड झाली असून ही बाब विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.
अधिराज सतिश ठुबे हा विद्यार्थी तालुक्यात ९ वा तर जिल्हा गुणवत्तायादीत ५३ वा आला. आकांक्षा सुनिल नाईकवाडी तालुक्यात ११ वी तर जिल्ह्यात ५७ वी आली. हर्ष कैलास ठुबे हा विद्यार्थी तालुक्यात २१ वा तर जिल्ह्यात १३७ वा आला. अनुष्का गोकुळ भागवत तालुक्यात ३० वी तर जिल्ह्यात १९४ वी आली तसेच कु. ईश्वरी सुनिल वाघुंडे ही विद्यार्थीनी ग्रामीण सर्वसाधारण ४ सेटमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत ४ थी आली.
या विद्यार्थ्यांना मराठी विषयासाठी विभागप्रमुख महेशकुमार साबळे, बुद्धिमत्ता विषयासाठी ओमप्रकाश देंडगे, गणित विषयासाठी वैशाली सुंबे तर इंग्रजी विषयासाठी नामदेव ठुबे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब वमने, पर्यवेक्षक जयसिंग ठुबे, स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य कान्हूरपठार, विविध पतसंस्थांचे पदाधिकारी व सदस्य, पंचक्रोशीतील थोर देणगीदार व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
COMMENTS